breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले..

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासुन चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्यानंतर या आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी हा प्रश्न हाताळला होता. आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला होता. त्यावेळी आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. यामध्ये मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून २०१४ मध्ये १६ टक्के आरक्षण दिले आणि मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा ५० जाती शोधून ५ टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते, असं सांगतानाच आमचं सरकार पाडण्यात आलं आणि हे आरक्षण टिकू शकल नाही.

हेही वाचा  –  विश्वचषकावर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्श विरुद्ध एफआयआर! मोदींकडे केली मोठी मागणी 

देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत १६ टक्केच्या ऐवजी १२ टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला होता. मात्र ती निव्वळ फसवणूक होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येत नाही. त्यांच्यात तेवढं धाडस उरलेलं नाही. निवडणुका घेतल्या नाही तर आरक्षणाला अर्थ नाही, असं ते म्हणाले. धनगर समाजाला १५ दिवसात आरक्षण देतो असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता तेच बोलतील, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button